भुसावळच्या भूमिपूत्राची महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकपदी निवड


भुसावळ : शहरातील भुमीपूत्राला महानिर्मितीमध्ये महानिर्मितीच्या कार्यकारी संचालक पदावर संधी मिळाली आहे. शहरातील रहिवासी तथा दीपनगर औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांची पदोन्नतीवर अतिरीक्त पदभार देवून नियुक्ती झाली आहे. हरणे यांनी यापूर्वी भुसावळ, कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात प्रदूषणावर मात करुन कमी खर्चात वीज निर्मितीची कसब साधली होती. यासोबतच त्यांनी महानिर्मितीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चात बचत करण्यासाठी प्रयत्न केले होते. महानिर्मितीच्या प्रकाशगड मुख्यालयातील फ्युल विभागाचे मुख्य अभियंता अभय हरणे यांना कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार देवून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता मुख्यालयाच्या फ्युल विभागाच्या मुख्य अभियंता पदासोबतच भुसावळ, परळी, नाशिक, उरण व जलविद्यूत केंद्राच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार असेल. याबाबतचे आदेश शुक्रवारी कार्यकारी अभियंता मानव संसाधन यांनी काढले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !