पोलिस अधिकार्‍यांसह वरीष्ठ अधिकार्‍यांच्या लवकरच होणार बदल्या


Transfers of senior officials including police officers will happen soon जळगाव : येत्या महिन्याभरात राज्यात मोठ्या प्रशासकीय बदल्या होण्याची शक्यता असून पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह मंत्रालयातील सचिव आणि इतर उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती आहे.

लवकरच होणार फेरबदल
दिवाळी संपल्यावर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय फेरबदल होणार आहेत. प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील मोठ्या महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी इत्याही पदावर मोठे फेरबदल होणार आहेत

वरीष्ठ पदावरील अधिकार्‍यांच्या होणार बदल्या
वरीष्ठ आयएएस अधिकार्‍यांसह राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल होणार आहेत. यासोबतच मंत्रालयातील सार्वजानिक बांधकाम विभागाचे सचिव दर्जाचे अधिकारी, महसूल, गृह, वित्त, यादेखील बदल्या होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, अकोला जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांचा बदल्या होऊ शकतात. त्याचबरोबर पोलीस आयुक्त, डीआयजी, आयजी या पदांवर मोठे फेरबदल होण्याची आहे. पुढील काही दिवसातच या बदल्या होण्याची शक्यता आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !