Shinde government’s second phase of cabinet expansion soon! शिंदे सरकारचा दुसर्या टप्प्यातील मंत्री मंडळ विस्तार लवकरच !
Shinde government’s second phase of cabinet expansion soon! जळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी या बहुप्रतीक्षित मंत्री मंडळ विस्ताराला मुहूर्त मिळण्याचे चिन्हे आहेत. शिंदे गटातील चार आमदारांना, तर भाजपच्या चार आमदारांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसर्या टप्प्यातील मत्री मंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.
डिसेंबरमध्ये नागपूरात अधिवेशन
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर जवळपास सव्वा महिन्यांनी पहिला कॅबिनेट विस्तार झाला होता. त्यानंतर आता आणखी अडीच महिने उलटल्याने दुसर्या मंत्रिमंडळ विस्ताराची आमदारांना प्रतीक्षा आहे. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे पुढच्या 15 ते 20 दिवसात विस्ताराची अपेक्षा आहे. दुसर्या टप्प्यात कॅबिनेटबरोबरच राज्यमंत्रीपदेही भरण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

यांची नावे आहेत चर्चेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता असून पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रीपद निश्चित समजले जात आहे. याशिवाय भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रकाश आबीटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम यांचीही नावं चर्चेत आहेत.
बच्चू कडूंची नाराजी होणार दूर !
ठाकरे सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची धुरा सांभाळलेले आणि शिंदे सरकारमध्ये मंत्री पदाकडे डोळे लावून बसलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रीपद मिळणे निश्चित मानले जात आहे. मंत्री पद न मिळाल्याने बच्चू कडू आक्रमक झाल्याचे अलिकडेच दिसून आले आहे.