खडसे समर्थकांचा राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Khadse supporters cheer for NCP Maharashtra : Entry Into ShivSena in the Presence Of The Guardian Minister मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघातील माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थक व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
जळगावातील विश्रामगृहावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते बाळासाहेबांची शिवसेना व बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारसंघातील खडसे समर्थक तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, रेंभोटा येथील छोटू पाटील, वाघाडीचे भैय्या पाटील, भूषण पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, नगरसेवक आरीफ आझाद, पियुष मोरे, मुकेश वानखेडे उपस्थित होते.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
मुक्ताईनगरातील राष्ट्रवादीचे जिल्हा सोशल मेडिया सेलप्रमुख माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, , निंभोरा स्टेशन राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस वाय.डी.पाटील, निंभोरा स्टेशनचे उपसरपंच प्रशांत पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया ब्लॉगर शुभम मुर्हेकर (धामोडी) यांनी कार्यकर्त्यांसाहित शिवसेनेत प्रवेश केला.