When Will The Municipal Elections Be Held : The Chief Minister’s Office Gave This Important Information पालिका निवडणुका कधी होणार : मुख्यमंत्री कार्यालयाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
When Will The Municipal Elections Be Held : The Chief Minister’s Office Gave This Important Information मुंबई : विविध कारणास्तव राज्यातील लांबलेल्या निवडणुकावरून राजकीय आखाडा पेटला असतानाच आता मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा असून राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे, असं काही प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त तथ्यहीन आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसदर्भात निर्णय घेणार आहे. निवडणुकीचा चेंडू हा न्यायालयाच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकांबाबत संशय कल्लोळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य केले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका कधी होणार हे फक्त परमेश्वर आणि न्यायालयाच माहित असल्याचे सांगितले होते. यामुळे निवडणुकांबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमिवर, मुख्यमंत्री कार्यालयाने नेमक्या निवडणुका कधी होणार ? याबाबतचे वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे.

- भुसावळात माफक किंमतीत घर हवे आहे मग हा व्हिडिओ नक्की पाहायलाच हवा !