भुसावळात उद्या शिवसेना शाखेचे उद्घाटन : असंख्य कार्यकर्ते करणार प्रवेश
भुसावळ : शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते शनिवार, 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता अमरदीप टॉकीज चौकातील छोटेखानी कार्यक्रमात पक्ष प्रवेश करणार आहेत तसेच यावेळी जाम मोहल्ला, कलाली वाडा येथे पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात येईल.
पक्षाचे वाढणार बळ : नमा शर्मा
भुसावळ शहरासह तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात इनकमिंग वाढले असून, आगामी निवडणुकांत या पक्षाला चांगले भवितव्य असल्याने, भाजपसह व इतर पक्षाचे कार्यकर्तेदेखील या पक्षात येण्यास इच्छुक आहेत, अशी माहिती शहर समन्वयक व कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी दिली.

दरम्यान, पक्ष प्रवेश सोहळ्यास
संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्क प्रमुख मनोहर पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, सहसमन्वयक उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक संजय ब्राम्हणे व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, रेलकामगार सेना, अल्पसंख्याक आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, शिक्षक सेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.