जळगावात लाखांच्या दागिण्यांवर चोरट्यांचा डल्ला
Thieves raid on jewelery worth lakhs in Jalgaon जळगाव : शहरातील रिंगरोडवर असलेल्या हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या दुकानातून चोरट्यांनी दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत एक लाख 2 हजार 659 रुपयांचे दागिने चोरून नेल्याने सराफा बांधवांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीची संधी साधत केली चोरी
जळगावच्या रिंगरोड येथील दीनानाथ वाडीत राहणारे अभिषेक सुनील बाफना यांच्या हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज दुकानातून 21 ऑक्टोंबरच्या रात्री 8.45 ते दि.23 च्या सायंकाळी 6.30 च्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत एकलाख 2 हजार 659 रुपयांचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी दुकानातून सोने आणि डायमंडचे दोन मंगळसूत्र आणि 2 अंगठ्या असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अभिषेक बाफना यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय किशोर पवार करीत आहेत.

