भुसावळात गुरूनानक जयंतीनिमित्त गुरूद्वारात विविध कार्यक्रम


भुसावळ : गुरूनानक जयंतीनिमित्त शहरातील गुरूद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. यात श्री अखंड पाठ, प्रभात फेरी सुरू झाली आहे. सकाळी 5 ते 7.30 या वेळीत प्रभात फेरी 28 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबरपर्यत आयाजेन केले आहे. यात दररोज महिला, पुरूष मिळून 150 जणांचा समावेश आहे.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन



शहरातील जळगाव रोडवरील गुरूद्वारात गुरूनानक जयंती निमित्तत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात 9 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबर या काळात श्री अखंड पाठ सुरू झाला आहे. 8 नोव्हेंबरपर्यत हे कार्यक्रम सुरू राहणार आहे. दररोज सकाळी पाचला गुरूद्वारापासून प्रभात फेरीला सुरूवात होते. शहरातील विविध मार्गावरून ही प्रभात फेरी पुन्हा गुरूद्वारात येत असते. यंदा हा 553 वा प्रकाश उत्सव आहे. बुधवार, 2 रोजी प्रभात फेरी तापीनगर, शांती नगर या भागात जाणार आहे तर गुरूवार, 3 रोजी नाहाटा कॉलेज परीसर, शुक्रवार, 4 रोजी गजानन नगर, सोमाणी पार्क, शनिवार, 5 रोजी 40 बंगला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग (आरपीडी), रविवार, 6 रोजी शारदा नगर, कुळकर्णी प्लॉट या भागात जाणार आहे.

असे आहेत कार्यक्रम
गुरूद्वारात लंगरचा कार्यक्रम 4 ते 8 नोव्हेंबर या काळात दुपारी 12 ते 2 व रात्री 8 ते 10 या वेळात होईल. सोमवार, 7 रोजी दुपारी 1.30 गुरूद्वारापासून शोभायात्रेला सुरूवात होईल. ही शोभायात्रा रात्री 8.30 पर्यत पुन्हा गुरूद्वारात येणार आहे. तर मंगळवार, 8 रोजी जन्मोत्सवाच्या दिवशी रात्री दहाला कीर्तन, आरती, दीपमाला, फुले उधळणे, आतषबाजी या दिवशी होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !