आमोदा-भुसावळ रस्त्यावर दुचाकी अपघात : 50 वर्षीय इसमाचा मृत्यू


Two-Wheeler Accident On Amoda-Bhusawal Road : Death of 50  Year-Old Isma

यावल : आमोदा ते भुसावळ रस्त्याच्या दरम्यान अचानक दुचाकी समोर म्हैस आल्याने 50 वर्षीय इसम गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रेमचंद खुशाल विजयवर्गीय-मारवाडी (50, रा.मोरगाव, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.



दुचाकीसमोर म्हैस आल्याने अपघात
यावल तालुक्यातील आमोदाकडून भुसावळला दुचाकीद्वारे प्रेमचंद खुशाल विजयवर्गीय-मारवाडी हे जात असताना त्यांच्या दुचाकीसमोर आमोदा गावाजवळ अचानक म्हैस आली व दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले व त्यांना तातडीने तेथून गोदावरी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज जळगाव खुर्द येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पो.लिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार गोकुळ तायडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !