भुसावळातील विठ्ठल मंदीरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी


भुसावळ : शहरातील व्हीएम वॉर्डातील विठ्ठल मंदीरात भाविकांनी पाडुरंगाच्या दर्शनासाठी कार्तिकी एकादशीनिमित्त शुक्रवारी मोठी गर्दी केली होती. एकादशीनिमित्त मंदीरातील मूर्तींना अभिषेक, पूजा, आरती, प्रसाद वाटप करण्यात आले. विठ्ठल मंदिरावर रोषणाई करण्यात आली. दोन वर्ष कोरोनामुळे दर्शन घेता आले नसलेतरी आता कोरोनाचे संकट नसल्याने यंदा भाविकांनी मंदीरात जाऊन विठूनामाचा जयघोष करीत दर्शन घेतले.

सकाळपासून भाविकांची दर्शनार्थ गर्दी
शहरातील व्हीएम वॅार्डातील विठ्ठल मंदिराला 273 वर्षांची परंपरा आहे. एकादशीनिमित्त सकाळी मंदिरात मूर्तीला अभिषेक, आरती, पूजा करण्यात आली. कार्तिकी एकादशीला मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन करण्यात आले. एकादशनिमीत्त मंदिराला रोषणाई, रंगरंगोटी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातील सुध्दा अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !