धक्कादायक ! : जळगावात कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न : सुदैवाने रोकड सुरक्षित


Shocking ! : Attempt to break into Canara Bank ATM in Jalgaon : Fortunately Cash Safe जळगाव : अलीकडेच जिल्ह्यात गॅस कटरद्वारे एटीएम फोडण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा शहरातील विसनजी नगरातील कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची बाब उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एटीएम न फुटल्याने रोकड वाचली
विसनजी नगरातील कॅनरा बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी गुरुवार, 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्याकडून एटीएम फोडले गेले नाही. परंतू यात एटीएम मशीनचे एक लाख 80 हजारांचे मोठे नुकसान झाले आहे. एटीएममधील रोकड सुरक्षित आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.



अज्ञात आरोपीचा कसून शोध
कॅनरा बँकेचे व्यवस्थापक प्रमोद गुरुनाथ कांबळे (48, विसजनी नगर, जळगाव) यांनी गुरुवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल फिरोज तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !