साकेगाव येथून अल्पवयीन मुलीस पळवले
A minor girl was abducted from Sakegaon भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार गुरुवार, 3 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

