फैजपूर शहरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
The thieves stole the bike from Faizpur City फैजपूर ; शहरातील शासकीय दवाखान्याच्या आवारात लावलेली 12 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
लालचंद्र चंद्रकांत कोळी (44, गाते, ता.रावेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फैजपूर शहरातील शासकीय दवाखान्याच्या आवारात दुचाकी (एम.एच.19 ए.के.8553) ही गुरुवार, 3 रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेचार दरम्यान चोरट्यांनी लांबवली. तपास नाईक अमजदखान अलीशेरखान पठाण करीत आहेत.

