Gang Active : Thieves stole a bike from Bhusawal टोळी सक्रीय : भुसावळातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
Gang Active : Thieves stole a bike from Bhusawal भुसावळ : शहरातील शिरपूर कन्हाळा रस्त्यावरील गणराय विहारासमोर चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांची टोळी सक्रिय
राहुल सुभाष पाटील (24, शिरपूर कन्हाळा, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, गणराय विहारासमोरून चोरट्यांनी दुचाकी (एम.एच.16 डी.के.7483) 5 ते 6 दरम्यान लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी न आढळल्याने बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक भूषण जैतकर करीत आहेत.

