यावल शहरात वयोवृद्धाला सर्पदंश


Elderly Snakebite in Yawal City यावल : शहरातील रेणुका माता मंदिराजवळील 60 वर्षीय वृद्धास घरात साफसफाई करताना सर्पाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येतात त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रकृती धोक्याबाहेर
शहरातील रेणुका देवी मंदिर परीसरात घरात दरवाज्याच्या फटीजवळ अशोक काशीराम ठाकरे हे साफसफाई करत असताना अचानक त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण भागामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले. येथे डॉ.परवीन तडवी, अधिपरीचारीका आरती कोल्हे, कादर तडवी आदींनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !