जळगावात भरधाव डंपरने तरुणीला चिरडले : भाऊ बचावला
Young woman crushed by speeding dumper in Jalgaon : Brother saved जळगाव : जळगावात डंपरने चिरडल्याने तरुणीचा मृत्यू ओढवला तर भाऊ बचावल्याची घटना शहरातील शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
डोक्यावरून चाक जाताच तरुणीचा मृत्यू
जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर (एम.एच.१९ सी.वाय.३३११) हा शिव कॉलनीकडून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात असताना पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एम.एच.१९ सी.७१६९) या डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (२०, रा.खोटे नगर, जळगाव) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (२५, रा.खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला. हा अपघात मंगळवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला.


अपघातानंतर शहर पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रामानंद पोलिसांनी राखेने भरलेला डंपर ताब्यात घेतला आहे.