सांगवी बुद्रुक येथील 33 वर्षीय तरुणाला दुचाकी चालवताना सर्पदंश
A 33-year-old youth from Sangvi Budruk was bitten by a snake while riding a bike यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील एका 33 वर्षीय तरुणाला दुचाकीद्वारे शेतात जात असतांना सर्पदंश झाला. दुचाकी वरच त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येतात तरुण स्वतःच यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्याने तातडीने उपचार करण्यात आल्याने त्याची प्रकृती स्थिर आहे
दुचाकीवर झाला सर्पदंश
सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील उद्धव सुधाकर पाटील (33) हा तरुण घरून दुचाकीद्वारे शेताकडे निघाल्यानंतर अचानक त्यांच्या दुचाकीवर साप आल्यानंतर त्याने उजव्या पायाला त्याने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येतात त्यांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालय गाठले. रुग्णालयात डॉ.सचिन देशमुख, अधिपरीचारीका नेपाली भोळे, मनीषा धांडे, दीपाली किरंगे, सुमन राऊत आदींनी प्रथमोपचार केले.

