शेंदुर्णीच्या युवकाचा आंबेवडगावजवळ अपघाती मृत्यू


भरधाव चारचाकीचे ब्रेक फेल झाल्याने वाहन आदळले झाडावर

पाचोरा : तालुक्यातील आंबेवडगावजवळ चारचाकीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊन युवक जागीच ठार झाला अन्य एक जण जखमी झाला. हा अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात योगेश राजेंद्र कुमावत (25) या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र अक्षय वसंत गुजर (24, दोन्ही रा.शेंदुर्णी) हा जखमी झाला आहे. जखमीला पाचोरा येथील विघ्नहर्ता रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारचाकी (एम.एच.15 जी.ए.8297) चे ब्रेक फेल झाल्याने ती झाडावर आदळून अपघात झाल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !