भुसावळात विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा


molestation of a married woman in Bhusawal : Crime against one भुसावळ : शहरातील अमरनाथ नगर भागात 36 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना मंगळवार, 6 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताविरोधात गुन्हा
एका भागातील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय विवाहितेचा संशयीत आरोपी मोनू रामदास कोल्हे (अमरनाथ नगर, भुसावळ) याने हात पकडत विनयभंग केला तसेच तू वेश्या व्यवसाय करण्यासाठी वैतागवाडीत जाते, असे सांगून अपमानीत करीत शिविगाळ केली व मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महिलेने केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.