जळगावातील महिला वकीलाची 11 हजारांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लांबवली


Thieves stole the wallet of a woman lawyer in Jalgaon containing 11,000 rupees जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकात बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी जळगाव शहरातील महिला वकीलाची पर्स लांबवली. आजोंबाच्या अंत्यविधी निघालेल्या महिला वकील निघाल्यानंतर ही घटना घडली. या प्रकरणी गुरुवारी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बसमध्ये चढताना लांबवली पर्स
प्रताप नगरातील अ‍ॅड.ज्योती सुरवाडे यांचे आजोबा मयत झाल्याने जामनेर जाण्यासाठी मंगळवार, 6 डिसेंबर रोनी दुपारी तीन वाजता त्या नवीन बसस्थानक येथे आल्या व जामनेर बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील पर्स लांबविली. काही वेळानंतर त्यांना पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. गुरूवारी रात्री आठ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पर्समध्ये नऊ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व दोन हजारांची रोकड असा एकूण 11 हजारांचा ऐवज होता.