साकळीतील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या उर्स सोहळ्यास उद्यापासून सुरुवात


साकळी : गावातील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास रविवार, 22 पासून सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे. या दिवशी सालाबादाप्रमाणे बाबांच्या संदल निमित्त वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. संदलनिमित्त जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरुन तसेच महाराष्ट्राबाहेरुन हजारो भाविक भक्त बाबांच्या दर्ग्याच्या दर्शनासाठी येतात.

हिंदू- मुस्लिम ऐकतेचे प्रतीक
हिंदू-मुस्लिम ऐकतेचे प्रतीक असलेला उर्स गावाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा असून ऐकतेचे प्रतीक आहे. प्राचीन काळी डांभूर्णी, ता.यावल येथील राजपूत परीवारातील महिला राजवंतीबाईस हजरत सजनशाह वली(रहे.) बाबांनी बहिण मानून राखी बांधून घेतली व राखीची भेट म्हणून जमिनी दिल्या. तेव्हापासून वंश परंपरेने या महिलेच्या परीरवारातुन आजही एकादशीला संदल निमित्त सर्वप्रथम बाबांच्या पवित्र मजारवर चादर चढविली जाते.




ऐतिहासिक दर्गा
हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे असून ख्याजा अजमेरी यांच्या सहकार्‍यांमध्ये गणना होते. बाबा शेकडो वर्षापूर्वीसाकळी येथे आले व त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे. दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो. दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधलेला असून लाकडाचा दरवाजा आहे.

आम लंगरचा कार्यक्रम
संदल निमित्त रविवारी कय्युमशाह बाबा व त्यांचे सहकारी व गावकर्‍यांच्या मदतीने दर्गा परीसरात लंगरे आम (महाप्रसाद) चे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहे. त्याचप्रमाणे रात्री दर्ग्यासमोर महफिले- समाँ या कार्यक्रमात असलम साबरी कव्वाल हे ईश्वरभक्ती व नआत म्हणून भाविकांना मंत्र -मुग्ध करणार आहे. या दर्गा परीसरात उर्स निमित्त पाच बाजार भरविले जातात. या उर्स दरम्यान सर्वत्र उत्साहाचे व धार्मिक वातावरण असते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !