माजी आमदार शिरीष चौधरींच्या जनसंवाद अभियानाला प्रारंभ

रावेर : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या जनसंवाद अभियानाला पातोंडी गावापासून प्रारंभ करण्यात आला. पातोंडी येथील विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जमलेल्या गावकर्यांशी माजी आमदार चौधरी यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ.राजेंद्र पाटील, नीळकंठ चौधरी, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, चिमण धांडे, आर.के.चौधरी, गुणवंत टोंगळे, ज्ञानेश्वर महाजन, किशोर पाटील, भानू मेद यांच्यासह पातोंडी येथील ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




