भुसावळातील माहेश्वरी समाजाचे दातृत्व ; पूरग्रस्तांसाठी मदतीचा ट्रक रवाना
भुसावळ : पश्चिम महाराष्ट्रात सांगलीसह कोल्हापूरात महापुरामुळे ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील माहेश्वरी समाजबांधवांतर्फे ट्रकभर जीवनाश्यक मदतीचे साहित्य रवाना करण्यात आले. प्रामुख्याने पूरग्रस्तांसाठी एक हजार कांबळे, एक हजार नवीन ड्रेस, अंडर पँट-बनियान, सर्व प्रकारची औषधी, पिण्याच्या पाण्याचे 15 हजार पाऊच, कोरडे खाद्यपदार्थ तसेच गुरांसाठी चुनी ढेप आदी पाठवण्यात आली. याकामी सांगलीचे दिनेश मुंदले यांचे सहकार्य लाभले तर बियाणी मिल्ट्री स्कूलतर्फे एक हजार ड्रेस देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
सोमवारी रात्री पश्चिम महाराष्ट्राकडे मदतीचे साहित्य घेवून ट्रक रवाना झाला. प्रसंगी आमदार संजय सावकारे, उद्योगपती मनोज बियाणी, नगरसेवक पिंटू (निर्मल) कोठारी, समाजाध्यक्ष राध्येश्याम लाहोटी, संजय लाहोटी, राजेश लढ्ढा, गोविंद हेडा, गोपाल हेडा, महेश हेडा, घनश्याम मंडोरा, जे.बी.कोटेचा, संजय चांडक, द्वारकादास दरगड, मनोज माहेश्वरी, राजेश पारीख, प्रवीण भराडे, मयूर नागोरी, सर्वेश लाहोटी, नितीन मंत्री, निलेश मंत्री, महेश भराडे, प्रेमराज लढ्ढा, रामवल्लभ झंवर, श्याम काबरा, अनिकेत राठी, रोहित लाहोटी, राहुल लढ्ढा, निलेश लाहोटी, हुकमीचंद रगड, मधुसूदन हेडा, दीपकचंद लढ्ढा, पिंटू हेडा, गिरीश मंत्री, शैलेश राठोड, वीणा लाहोटी, शशी लाहोटी, डॉ.संगीता चांडक, स्नेहा लढ्ढा, राधा झंवर, शीतल भराडीया, वंदना चांडक, राधा हेडा, सरीता चौक, पुष्पा लढ्ढा आदींची उपस्थिती होती.