औरंगाबाद नव्हे आता छत्रपती संभाजीनगर ; राज्याच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी


Chhatrapati Sambhajinagar, not Aurangabad; Central approval of state decision मुंबई : राज्याच्या निर्णयाला केंद्रानेदेखील मंजुरी दिल्याने आता औरंगाबादसह उस्मानाबादची नावे बदलली आहेत. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण झाले असून त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.

ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या बैठकीत या दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली होती. यानंतर या नामांतराच्या मंजुरीसाठी हे प्रकरण केंद्र सरकारकडे गेले होते. आता या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय दिला आहे. या चर्चेवर शुक्रवारी अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली आहे. ‘औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार ! असे ट्विट त्यांनी केले आहे. ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !