आठवावे शिवरायांचे रूप, आठवावा प्रताप

भुसावळ विभागात शिवजयंती उत्साहात : रात्री उशिरापर्यंत चालला मिरवणुकांचा जल्लोष


Shiv Jayanti in excitement in Bhusawal division भुसावळ : शहरासह परीसरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथी प्रमाणे) मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. भुसावळ शहरातील विविध भागातून आठ मिरवणुका सायंकाळी काढण्यात आल्या तर प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा याप्रसंगी साकारण्यात आली. यावेळी पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी दिवसभर शिवप्रेमींची गर्दी उसळली होती.

भुसावळात मिरवणुकांनी फेडले डोळ्यांचे पारणे
भुसावळ : शहरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील विविध भागातून शिवजयंतीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर युवकांनी मिरवणूकीत गर्दी केली होती. शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणूका या पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलिस ठाणे, स्टेशन रोडने रेल्वे स्थानकाबाहेरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मॉडर्न रोडने गांधी चौकी, सराफ बाजार, मोठी मशीद, अप्सरा चौक, जवाहर डेअरी, तेथून जामनेर रोडवर येत पांडुरंग टॉकीज मागील टिंबर मार्केट मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. शिवजयंती समितीतर्फे सकाळी नऊ वाजता नाहाटा कॉळेजपासून मोटर सायकल रॅली काढण्यात आली.

ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ
भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, रीतू प्रभूदेसाई, माधुरी गाजरे, अनिस खान, अनिता वाणी, मोहम्मद कय्यूम शेख, विजय संकट, जतीन मोरे, अभिषेक राठोड उपस्थित होते. शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भुसावळ
भुसावळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुक्याच्या वतीने शहरातील श्री महाराणा प्रताप चौक छत्रपती शिव जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक ललित मराठे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष नीरज वाघमारे यांनी केले. शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, विलास कोळी, दशरथ सपकाळे, प्रतीक भंगाळे, लोकेश देवकर, हरीष लोहार, पंकज कोळी, महेंद्र सपकाळे, शिवा वाढे, गिरीश कुलकर्णी, मुरली सोनवणे, सुरज चौधरी आदींची उपस्थिती होती.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !