कासव्यातील तरुणाला दारूसाठी पैसे न दिल्याने तिघांकडून मारहाण


A young man from Kaswa was beaten up by three people for not paying for alcohol यावल : तालुक्यातील कासवा या गावात 29 वर्षीय तरुणाकडे तिघांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र त्याने पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी त्यास मारहाण केली व त्यांच्या खिशातून दोन हजार रुपये बळजबरीने काढले. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा
कासवा येथे गावातील हनुमान मंदिराजवळ उमेश शामराव सपकाळे (29) हा तरुण उभा असताना त्याच्याजवळ बापू शामराव सपकाळे, बारकू सपकाळे व योगेश शांताराम सपकाळे (सर्व रा.कासवा) आले व त्यांनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यानंतर तरुणाने देण्यास नकार दिल्याने बापू सपकाळे यांनी त्याच्या उजव्या पायाच्या पंजावर फावड्याने दांडा मारून दुखापत केली तर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून पळ काढला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.के.शेख करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !