भुसावळातील गडकरी नगरातून चोरट्यांनी लोखंडी गेट लांबवले
Thieves extended the iron gate from Gadkari Nagar in Bhusawal भुसावळ : शहरातील सर्वे क्रमांक 196 मधील गडकरी नगरातून अडीच हजार रुपये किंमतीचे लोखंडी गेट चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
रेल्वे लोकोपायलट गोपाळ नथ्थूजी हिरळकर (54) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या राहत्या घराजवळील उघड्या गेटच्या संरक्षण कुंपणातून चोरट्यांनी अडीच हजार रुपये किंमतीचे लोखंडी गेट चोरट्यांनी 8 ते 10 मार्चदरम्यान लांबवले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक भूषण जैतकर करीत आहेत.

