बोदवड शहरात माथेफिरू तरुणाने चार्‍याच्या शेडसह दुचाकीला लावली आग


In Bodwad town a head-turning youth set fire to a two-wheeler along with a fodder shed बोदवड : शहरातील माळीवाडा भागातील ज्ञानेश्वर उर्फ नाना प्रकाश माळी (34) या रुणाने त्याच्याविरुद्ध पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग ठेऊन योगेश सुभाष माळी (36) या तरुणाच्या घरासमोर येऊन शिवीगाळ सुरू करीत दुचाकी (एम.एच.20 एफ.के.4264) अडवत दुचाकीस्वार अनिकेत श्रावण उमाळे, गणेश रामा देवरे (रेवती) यांना अडवत दगडाने मारण्याचा धाक दाखवून पळवून लावून दुचाकीतून पेट्रोलची नळी काढून बाटलीतील पेट्रोलने योगेश माळी यांच्या घरासमोरील चारा व कुट्टीने भरलेल्या शेडला आग लावली तसेच उर्वरीत पेट्रोल दुचाकीवर टाकून दुचाकीला आग लावली.

तरुणाविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा
या घटनेत योगेश माळी यांचे सुमारे दिड लाख रुपयांचे तर दुचाकीचे चाळीस हजारांचे नुकसान केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून योगेश माळी यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात संशयित नाना माळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


कॉपी करू नका.