सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरात उद्यापासून नवरात्रोत्सव
Navratri festival from tomorrow at Satapuda Niwasini Manudevi temple यावल : सातपुडा निवासिनी आई मनुदेवीच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाला बुधवारए 22 मार्चपासून मोठ्या उत्साहात सुरवात होत आहे. या करीताची तयारी मंदिर संस्थानकडून पुर्ण करण्यात आली आहे. चैत्र नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमी निमित्त मंदिरात गर्दी होण्याची शक्यता आहे तर सातपुड्यात सहलीसोबत दर्शनाचा आनंद भाविकांना मनसोक्तपणे लुटता येणार आहे.
भाविकांची होणार गर्दी : प्रशासनाकडून नियोजन
सातपुड्याच्या कुशीत हिरवाईने नटलेल्या वनराई क्षेत्र आई मनुदेवी मंदिर आहे. या मंदिरात बुधवार, 22 मार्चपासून चैत्र नवरात्रोत्सवाला सुरवात होत आहे. सालाबादाप्रमाणे येथे दरवर्षी चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात शनिवार व रविवारी भाविक-भक्तांची मोठी गर्दी होते. सुट्टीचा दिवस म्हणून पर्यटन सोबत दर्शनाचा योग अनेक जण साधतात. या चैत्र नवरात्रोत्सवाची तयारी मंदिर संस्थेचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील, नितीन भास्कर पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन. डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे व्यवस्थापक आर.के.पाटील, समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील, महेंद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.