भुसावळात उभ्या ट्रॅव्हल्समधून चोरट्यांनी 12 हजारांच्या बॅटर्या लांबवल्या
Thieves stole 12,000 worth of batteries from the traveling stands in Bhusawal भुसावळ : उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्समधून चोरट्यांनी 12 हजार रुपये किंमतीच्या बॅटर्या लांबवल्या. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
ट्रॅव्हल्स चालक डिगंबर बेनीराम बढे (55, चिंतामणी हॉस्पीटलच्या बाजूला, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील आदर्श नगराजवळील अपना गॅरेजजवळ त्यांनी ट्रॅव्हल्स उभी केली असताना 18 ते 19 दरम्यान चोरट्यांनी 12 हजार रुपये किंमतीच्या बॅटर्या लंपास केल्या. तपास हवालदार गणेश प्रल्हाद चौधरी करीत आहेत.