विवरा येथे वीज चोरी : दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल
Electricity theft in Vivara : A case has been registered against two in Yaval police यावल : विवरा, ता.रावेर या गावात वीज वितरण कंपनीकडून वीज चोरी संदर्भात धडक मोहिम राबवण्यात आल्यानंतर दोन जण वीज चोरी करतांना आढळून आल्याने या दोघांना दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र दोघांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दंड न भरल्याने दोघांविरोधात गुन्हा
विवरा वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता ए.बी.दमाडे सह वीज कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ विश्वास कुवर, निलेश फालक, पंकज पिंगळे, पवन पाटील यांच्या पथकाने विवरा गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. या मोहिमेत मंगला सुरेश गिरी व सईदखा इसा खा हे दोघे वीज चोरी करतांना आढळून आले तेव्हा मंगला गिरी यांना 13 हजार 151 तर सईद खान यांना दोन हजार 227 रुपये दंड अदा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. तडजोडीअंती दोघांना प्रत्येकी केवळ दोन हजार रुपये भरायचे होते मात्र त्यांनी दंड अदा न केल्याने दोघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.