जळगावात धूम स्टाईल चैन स्नैचिंग : भुसावळातील इराणी वस्तीत कोम्बिंगद्वारे झाडाझडती


Dhoom style chain snitching in Jalgaon : Deforestation by combing in Iranian settlement in Bhusawal  भुसावळ : जळगाव शहरातील एमआयडीसी व शनीपेठ हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धूम स्टाईल चैन स्नॅचिंगच्या घटना पाहता त्यातील संशयित इराणी असल्याची शंका पोलिस प्रशासनाला असल्याने या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्री 1 ते 3 दरम्यान शहरातील पापा नगर व इराणी वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. बाजारपेठ पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगारांच्या घरी धडक देण्यात आली मात्र संशयित आढळले नाहीत. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मात्र खळबळ उडाली.

संयुक्त कारवाई करीत कोम्बिंग
एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह विकास सातदिवे, किशोर पाटील, नाना तायडे, इम्रान सैय्यद, राहुल रगडे तसेच बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, प्रशांत परदेशी, निलेश चौधरी आदींच्या पथकाने मंगळवारी पहाटे एक ते तीन दरम्यान शहरातील पापा नगर, मुस्लीम कॉलनी भागात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी केली मात्र एकही गुन्हेगार आढळला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !