यावल-फैजपूर रस्त्यावर ट्रकचा अपघात : चालकासह क्लीनर बेपत्ता
Truck accident on Yaval-Faizpur road : Cleaner along with driver missing
भरधाव ट्रकला अपघात : चालकासह वाहकाचा पोलिसांकडून शोध

यावल : फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या पुढे एका ट्रकचा भीषण अपघात घडला असून अपघातानंत चालक व क्लीनर बेपत्ता झाले आहेत. ट्रक पुढील भाग थेट जमिनीत गाढला गेला असून अपघाताची माहिती यावल पोलिसांना कळताच त्यांनी धाव घेतली.
चालकासह वाहकाचा पोलिसांकडून शोध
यावल-फैजपूर रस्त्यावर महाविद्यालयाच्या पुढे यावलकडून फैजपूरकडे भरधाव वेगात ट्रक क्रमांक (एम.एच.18 बी.डब्ल्यू. 9581) हा जात असताना महाविद्यालयाच्या पुढे अपघात घडला व ट्रक रस्त्याच्या कडेला जावून उलटला. अपघातानंतर या वाहनातील चालक व क्लीनर दोघे बेपत्ता झाले आहेत. पोलिसांचे पथक आता या ट्रकमधून चालक आणि क्लिनरचा शोध घेत आहे. अपघातानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गर्दी देखील झाली.