डोंगरकठोर्‍यात वीज चोरी : दोघांविरोधात गुन्हा


Electricity theft in Dongarkathora : Crime against two यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने राबवण्यात आलेल्या वीज चोरीविरुद्ध मोहिमेत दोन जण वीज चोरी करतांना आढळले मात्र दंडात्मक नोटीसीला त्यांनी प्रतिसाद न देता दंडही न भरल्याने त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
डोंगरकठोरा येेथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता हेमंत चौधरी यांनी आपल्या पथकासह गावात वीज चोरांविरुद्ध मोहिम राबवली. संजय अशोक आढाळे व रमेश मोहन आढाळे हे वीज चोरी करताना मिळून आढळल्याने दोघांना आठ हजार 736 रुपये दंडाची नोटीस बजावली मात्र या दोघांनी दंड भरलाच नाही. या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !