भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर : मंत्रालयात बैठक
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा पाठपुरावा : वैद्यकीय सोयी-सुविधांमध्ये होणार वाढ
Bhusawal Rural Hospital to be converted into Upazila Hospital : Meeting in the Ministry भुसावळ : भुसावळातील ग्रामीण रुग्णालयाला लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार असून या संदर्भात शुक्रवारी मंत्रालयात आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.
मंत्रालयात अधिकार्यांची बैठक
शुक्रवारी मंत्रालयात आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार संजय सावकारे व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी घेतलेल्या बैठकीत रीक्त पदांचा अनुशेष यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी 14 दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री सावंत यांनी दिल्याचेही आमदार म्हणाले. आमदारांनी स्वच्छता कर्मचार्यांचे कंत्राट संपल्याने होणारी अस्वच्छता, कंत्राटी चालक नसल्याने रुग्णांचे होत असलेल्या गैरसोय लक्षात आणून दिली. दरम्यान, रीक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रयत्न करावेत यासोबत सफाई कर्मचारी व वाहन चालक यांचे पदे तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारीने भरण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत.
