अनैतिक संबंधात सासरा अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने केला खून
किनगावातील खुनाची उकल : आरोपी प्रियकरास सुनेला अटक
यावल : अनैतिक संबंधात सासऱ्याचा अडथळा वारंवार येत असल्याने सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्याचा खून केल्याची घटना किनगाव येथे उघडकीस आली आहे. जळगाव गुन्हे शाखेने या प्रकरणी आरोपी प्रियकरासह किनगावातील सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. जावेद शाह अली शाह फकीर (३२, , प्रतिभा नगर, वरणगाव, ह.मु.उदळी, ता.रावेर) व मिनाबाई विनोद सोनवणे (३०, किनगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आरोपीने दिली खुनाची कबुली
किनगाव येथील ५८ वर्षीय इसमाच्या खून प्रकरणी उदळी, ता. रावेर येथील २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मयत इसमाच्या सुनेने तिच्या प्रियकरच्या मदतीने ही कृत्य केले, सदर प्रियकर वारंवार किनगाव येथे यायचा तेव्हा तो इथे का येतो ? याचा जाब मयत भीमराव सपकाळे यांनी विचारला होता त्याचा त्याला सतत राग यायचा यातुन हा गुन्हा घडला असुन संशयीतास पोलिसांनी भुसावळ येथून रात्री ताब्यात घेतले व त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अनैतिक संबंधाला विरोध केल्याने केला खून
उदळी, ता. रावेर येथील जावेद शाह अली शाह फकीर या तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार किनगाव ता. यावल येथील भीमराव सपकाळे (५८) यांची सून मीना विनोद सोनवणे हिच्या बहीणीचे उदळी येथे सासर आहे व मीना हि ची विवाहपुर्वी उदळीला जायची तेथे तिची ओळख जावेद शहा अली शाह फकीर सोबत झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये जवळीक झाली होती तेव्हा विवाहनंतर जावेद शाह हा किनगाव येथे येऊ – जाऊ लागला होता. दरम्यान त्याचं येणं जाणं हे भीमराव सोनवणे यांना आवडत नव्हतं त्यातच जावेद शहा हा गुरुवारी देखील दुपारी आला व त्याने आपल्या दुचाकी वर भीमराव सपकाळे यांना घेऊन यावल व गावात फिरला सोबत दारू पिला आणि रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चुंचाळे जवळील पुलावर येऊन त्याचं भांडण भीमराव सोनवणे यांच्यासोबत झालं आणि तेथेच त्यांनी चाकूने वार करून त्यांची हत्या केली असे त्याने पोलिसांना जबाब सांगितले.
भुसावळच्या रिदम हॉस्पिटल जवळून केली अटक
टेक्निकल व विवाहितेच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती घेऊन पोलिसांचा आरोपीवर संशय बळावला व त्यानंतर त्याच्या शोध घेत असताना तो भुसावळ येथील रिदम हॉस्पिटल जवळ मिळून आला व तिथून त्याला अटक केली या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.