भुसावळ शहरात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी


भुसावळ : वरणगावकडून भुसावळकडे येत असलेल्या ॲक्टीवा स्वारास कंटेनरने दिलेल्या धडकेत ॲक्टीवास्वार याेगेश साेन्ने (रा. वाकडी, ता. जामनेर, हल्ली मुक्काम जळगाव पाेलिस लाईन) हा जखमी झाला. याप्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना निंभाेरा गावाजवळ मंगळवार, २१ रोजी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान घडली.

कंटेनर चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा
याेगेश नारायण साेन्ने हे ॲक्टीवा गाडीने (एम एच १८ सीई १६६५) वरून वरणगाव वरून भुसावळ कडे येत असतांना मालवाहू कंटेनर (एनएल ०१ ए ई ३६९५) यावरील चालकाने निंभोरा गावाच्या पुढे राष्ट्रीय महामार्गावर रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडीला समाेरून धडक दिली. यात योगेश सोन्ने यास गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी निंभाेरा येथील पाेलिस पाटील मुरलीधर धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास योगेश पालवे हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !