भुसावळात प्रभाग 24 साठी पोटनिवडणूक : संथ गतीने मतदान


तिघे उमेदवार रींगणात : उद्या निकालानंतर चित्र होणार स्पष्ट

भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 अ मधील एका जागेसाठी गुरुवार, 9 रोजी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. नाहाटा महाविद्यालय, ताप्ती स्कूल व बर्‍हाटे विद्यालयातील सात मतदान केंद्रावर निवडणूक होत असून सकाळी 11 वाजेपर्यंत सुमार 12 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत.

दुपारून मतदानाचा टक्का वाढण्याची आशा
सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान मतदान होत असून दुपारनतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, भाजपातर्फे रेखा सुनील सोनवणे तर शिवसेनेतर्फे विक्की चव्हाण रींगणात आहेत. निवडणुकीसाठी एका केंद्रावर पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात एका केंद्राध्यक्षासह चार कर्मचार्‍यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी करुणा डहाळे या काम पाहत आहेत. या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्यात येणार असलातरी व्हीव्हीपॅट नसणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.




उद्या चित्र होणार स्पष्ट
प्रभाग 24 मधील निवडणुकीची प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवार, 10 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. त्यासाठी तीन टेबल लावण्यात येणार आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !