भुसावळात रेशन मालाचा काळाबाजार : अजिंक्य जैन यांना अटक


Black market of ration goods in Bhusawal : Ajinkya Jain arrested भुसावळ : शहरातील भारत नगरासह आठवडे बाजारात रेशन मालाची काळ्या बाजारात विल्हेवाट लावताना बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत पाच लाखांचा तांदूळ व पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली होती.

मुख्य संशयीत अटकेत
13 नोव्हेंबर 2022 रोजी ही कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजिंक्य रमेश जैन (28, गोविंद कॉलनी, आनंद नगर, भुसावळ) यास मंगळवार, 11 रोजी अटक करण्यात आली. संशयीताला भुसावळ न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !