आगामी निवडणुकीत सेना-भाजपाचेच सरकार ; देवेंद्र फडणवीस ; शिंदे गटांच्या जागांबाबात केले हे विधान


Sena-BJP government in upcoming elections ; Devendra Fadnavis  मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला 50 जागा देण्यासंदर्भात भाषण दिल्यानंतर शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला तर शिवसेना नेत्यांनी तो बावनकुळेंच्या अधिपत्याखालील विषयच नसल्याची टीका केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तसे सांगितले मात्र तेथे कॅमेरा लागला आहे, हे त्यांना ठावूक नव्हते. 2024 साठी भाजप-शिवसेना-रिपाइं आणि आमचे सर्वच मित्र पक्ष एकत्र लढतील. जागा वाटपाचा जो मुद्दा आहे तेही व्यवस्थित होईल. शिवसेनेला योग्य जागा दिल्या जातील, त्यावरुन कुठलाही वाद होणार नाही, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

अमित शहा म्हणाले होते योग्य वेळी निर्णय
राज्यातील शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 आमदार भाजपसोबत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात येते मात्र शिवसेनेला किती जागा देण्यात येतील, याबद्दल अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनीही याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असे म्हटले होते.

फडणवीस म्हणाले आता कुणीही करतो शुटींग
बावनकुळे यांनी जे म्हटलं होतं, ते कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी म्हटलं होतं. तो एक लहानसा कार्यक्रम होता, त्यांनाही माहिती नव्हत की तिथ कॅमेरा लागला आहे. अलिडकच्या काळात कुणीही शुटींग करत असते, असे म्हणत फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याची पाठराखण केली. देवेंद्र फडणवीस यांनीही या जागावाटपाबाबत आणि पुढील निवडणुकांबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, 2024 साठी भाजप-शिवसेना-रिपाइं आणि आमचे सर्वच मित्र पक्ष एकत्र लढतील. जागावाटपाचा जो मुद्दा आहे तेही व्यवस्थित होईल. शिवसेनेला योग्य जागा दिल्या जातील, त्यावरुन कुठलाही वाद होणार नाही, ते 100 टक्के फेअर डिस्ट्रीब्युशन असेल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबाबत स्पष्टीकरण दिले तसेच 2024 मध्येही पुन्हा शिवसेना-भाजपचंच सरकार निवडून येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !