माध्यमांपुढे अजित पवाारांनी स्पष्टच सांगितले : वज्रमुठ सभेत भाषण करणार नाही !


Ajit Pawar clearly said in front of the media : Vajramuth will not make a speech in the meeting! नागपूर : नागपूर शहरात आज दुसरी वज्रमुठ सभा महाविकास आघाडीतर्फे होत आहे. या सभेत बोलणार नसल्याची स्पष्ट माहिती राष्ट्रवादीची नेते अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

प्रत्येक सभेत दोन मान्यवरच करणार भाषण ः दादांचे स्पष्टीकरण
नागपूर सभेनंतर नाशिक आणि कोल्हापूर येथे वज्रमुठ सभा पार पडणार आहे. तर प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषण करायचं असं ठरलेले असल्याचे पवारांनी सांगितले. तसेच मागे झालेल्या सभेत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण, शिवसेनाकडून उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे आणि राष्ट्रवादीकडून मी आणि धनंजय मुंडे यांनी भाषण केलं होतं.त्यामुळे यावेळी आजच्या सभेत आमच्या तर्फे जयंत पाटील आणि अनिल देशमुख भाषण करणार आहेत.

मर्यादीत वेळेत भाषण जनतेला ऐकायला मिळावे हाच उद्देश
देशमुख हे विदर्भातील आहेत. पाटील हे पक्षाचे प्रांतध्यक्ष आहेत. नाना पटोले आणि सुधीर केदार हे बहुतेक भाषण करतील. मर्यादीत वेळेत भाषण जनतेला ऐकायला मिळावं हे या मागचा हेतु असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !