रावेरमध्ये विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड


रावेर : नगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापतींची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार उषारणी देवगुणे उपस्थित होत्या. त्यांना मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सहकार्य केले.

समितीनिहाय सभापती असे- सार्वजनीक बांधकाम समिती- खां असदुल्ला खां महेबूब खाँ,
स्वच्छता आरोग्य व दवाखाना समिती- सुधीर गोपाल पाटील, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती- आसीफ मोहमंद दारा मोहम्मद, महिला व बालकल्याण समिती- संगीता शिरीष वाणी. यावेळी झालेल्या सभेत नियोजन व विकास समितीचे सभापती पदासाठी उपाध्यक्ष हे पदसिध्द सभापती राहतील असे ठरले तर समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्ष राहणार आहेत. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष अध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहमद असतील तर नियोजन व विकास समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, स्वच्छता आरोग्य व दवाखाना समिती, पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती, महिला व बालकल्याण समितीचे सभापती या समितीचे सदस्य म्हणून राहतील.




यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, नगरसेवक सुरज चौधरी, प्रल्हाद महाजन, पार्वताबाई शिंदे, संगीता अग्रवाल, आसीफ मोहमद, संगीता वाणी, ललिता बर्वे, रंजना गजरे, शे.नुसरत यास्मिन, शारदा चौधरी, यशवंत दलाल, संगीता महाजन, प्रकाश अग्रवाल यांच्यसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. विषय समित्यांच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीवेळी 19 नगरसेवक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !