भुसावळ तालुक्यातील व्यापार्‍यांना होणारा त्रास मोडून काढणार : आमदार संजय सावकारे


The trouble faced by the traders in Bhusawal taluka will be broken : MLA Sanjay Savkare  भुसावळ : बाजार समिती निवडणुकीत विरोधकांनी जे उद्योग केले आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीही नाही, त्यांनी मतदारांना धनादेश दिले तेदेखील अद्यापही वटलेले नाही, अशी मिश्कील टिका करीत आगामी काळात शेतकर्‍यांच्या हातात सत्ता द्यायची आहे व सर्व उमेदवार आपले शेतकरी असून मागील काळात त्रास जो व्यापार्‍यांना झाला तो मोडून काढायचा आहे, असे स्पष्ट मत आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ शहरातील स्टार लॉनमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या कृउबा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार संतोष चौधरींचे नाव न घेता त्यांनी टिकेचे बाण चालवले. व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजपाचे उमेदवार उपस्थित होते.

विजय भाजपाचाच होणार
आमदार सावकारे म्हणाले की, बाजार समिती निवडणुकीत शेतकर्‍यांचे पॅनल उभे करण्यात आले असून त्यात कुटूंबातील कुणालाही उमेदवारी नाही, आज मेळाव्याला 80 टक्के मतदारांची उपस्थिती असल्याने विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आता चालणार नाही मनमानी : रक्षा खडसे
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, आमदारांनी आपल्याला येथे मागील काळात काय-काय चुका झाल्या याची कल्पना दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना तसेच व्यापार्‍यांना त्रास देण्याचे प्रकार झाले शिवाय अनेक लोक बेरोजगार झाले त्यामुळे ही मनमानी यापुढे आता चालणार नाही. आता मतदारांचीदेखील ही जवाबदारी असणार आहे की त्यांनी चांगल्या उमेदवारांना निवडून द्यायला हवे. मार्केट कमेटीच्या माध्यमातून चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभे करता येईल शिवाय कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करता येईल व त्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या शेत मालाला चांगला भाव मिळणे शक्य होईल, असेही खासदार म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !