भुसावळ गोळीबारातील जखमी तरुणाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू


Youth injured in Bhusawal firing dies during treatment in Mumbai भुसावळ : महामार्गावर चारचाकीचा कट लागल्यानंतर झालेल्या वादातून त्रिकूटाने भुसावळातील दोघा तरुणांवर गोळीबार केल्याची घटना साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवार, 14 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता घडली होती. गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. अक्षय व मंगेश या तरुणांना गोदावरीतून अधिक उपचारार्थ मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरत्यान अक्षयची शनिवारी सकाळी प्राणज्योत मालवली. दरम्यान, गोळीबार प्रकरणातील आरोपींविरोधात आता खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

किरकोळ वाद बेतला तरुणाच्या जीवावर
अक्षय सोनवणे व मंगेश कोळे हे अन्य दोघा मित्रांसह शुक्रवार, 14 रोजी रात्री चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही.0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाल्यानंतर दुचाकीला कट लागल्यानंतर संशयितांनी जाब विचारला व त्यातून वाद वाढत गेल्यानंतर संशयित करण संतोष सपकाळे याने कमरेला लावलेला कट्टा काढून दोन गोळ्या झाडल्याने अक्षय व मंगेश गंभीररीत्या जखमी झाले होते. अक्षय याची प्रकृती खालावल्यानंतर त्यास मुंबईत उपचारार्थ हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याची प्राणज्योत मालवल्याची माहिती भुसावळ तालुका पोलीस सूत्रांनी दिली.

तिघा आरोपींविरोधात वाढणार खुनाचे कलम
गोळीबार प्रकरणी करण सपकाळे, संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (तिन्ही रा.खडका, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली होती तर संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांच्याविरोधात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !