Uddhav Thackeray उद्धव ठाकरे आज कुणावर चालवणार टिकेचे बाण : पाचोर्यातील सभेकडे राज्याचे लक्ष
Who will Uddhav Thackeray target today : State’s focus on meeting in Pachora पाचोरा : राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्ह्यातील ही पहिलीच सभा पाचोरा शहरात होत आहे. ठाकरे सभेत कुणा-कुणावर टिकेचे बाण चालवणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी सभेच्या दृष्टीने काटेकोर बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
सायंकाळी विराट मैदानावर होणार सभा
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवार, 23 एप्रिल रोजी पाचोरा येथे येत आहेत. अटल मैदानावर सायंकाळी 6:30 वाजता त्यांची जाहीर सभा होता आहे. रविवारी दुपारी 12.30 वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी पाच वाजता माजी आमदार स्व. आर. ओ. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ते अनावरण करतील. सायंकाळी 6:30 वाजता सभा होईल. रात्री 9:30 वाजता ते जळगावमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत.

