पंधरा दिवस थांबा : राज्यातील हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच ! : संजय राऊतांचा दावा


This government will not last! Will collapse in 15 days: MP Sanjay Raut’s claim stirs up excitement जळगाव : 15 दिवस थांबा, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोळसणारच, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच राऊतांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. आगामी 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे. या सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघाले आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

हे सरकार कोसळणारच !
प्रत्येकजण आपापली गणिते मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. मी मागे एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेले आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !