पाकिस्तानला विचारा शिवसेना कुणाची, तेही सांगतील : पाचोर्यात उद्धव ठाकरे
पाचोरा : पाकिस्तानला विचारा शिवसेना कुणाची, तेही सांगतील. पण, आमच्याकडे धृतराष्ट्र झालेल्या निवडणूक आयोगाला समजत नाही. निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा सगळं पाहतोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी येथे झालेल्या सभेत केली. राज्यातील सत्तासंघर्ष व शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे यांची जिल्ह्यात पहिलीच सभा झाली. आपल्या आक्रमक शैलीत ठाकरे म्हणाले की, काही जणांना वाटतं की ते म्हणजे शिवसेना, अरे हाट…यांना जसं घोड्यावर चढवलं होतं, तसं खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या निष्ठेला, भगव्याला कलंक लावला, तो कलंक लावणारे हात आपल्याला काढून टाकायचे आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
हे तर उलट्या पायाचे सरकार
ठाकरे महणाले की, आपलं सरकार होतं, त्यावेळेस कोरोनाचं जागतिक संकट होतं. आमच्या वेळेसही नैसर्गिक संकटं आली. मी प्रत्येक सभेत विचारतो, आमच्या काळात तुम्हाला मदत मिळत होती की नव्हती? पण, हे उलट्या पायाचे सरकार आल्यापासून मदत बंद झाली. आम्ही बोलायचे नाही, तर काय करायचो. आजकाल सरकारविरोधात किंवा खरं बोलणार्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला जातो, असंही उद्द ठाकरे म्हणाले.

