जळगाव जिल्ह्यातील बेडीत गावात पावसाने हाहाःकार : दोनशेवर घरांची पडझड, संसार उघड्यावर
Bedit village of Jalgaon district is devastated by rain: more than 200 houses collapse, life is exposed जळगाव : जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील बेडी, ता.जळगाव येथे सर्वाधिक नुकसान झाले. अवकाळी पावसासह चक्रीवादळात गावातील सुमारे दोनशे हून अधिक घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले तर झाडे उन्मळल्याने रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला. जिल्हा परीषद शाळेची पत्रे उडाल्याने शाळा उघड्यावर आली असून या घटनेत तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बेडीसह परिसर अंधार सापडला आहे. तर 50 वर झाडे उन्मळून पडल्याने नशिराबाद-बेडी रस्त्यावरची ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले आहे.
झाडे उन्मळली, घरावरील पत्रे उडाली
बेडी गावात झालेल्या वादळी पावसात पत्रे उडाली तर वृक्ष उन्मळली तसेच वीज पोल पडल्याने गावातील वीजपुरवठा ठप्प झाला. या घटनेत नारायण गोविंदा पाचपांडे, सरिता रवींद्र नारखेडे, भागवत चिंधू नारखेडे जखमी झाले. गुरुवारी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान बेडी गावात गारपीटसह जोरदार अवकाळी पाऊस झाला व नंतर आलेल्या भयंकर वादळाने अनेकांचा संसार उद्ध्वस्त केला.

