मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी गारपीटीने केळीसह मका, कांदा उत्पादकांना फटका


मुक्ताईनगर : मुक्ताईनगरसह परीसरात सलग दुसर्‍या दिवशी गारपीट व वादळी पावसाने झोडपून काढल्यानंतर केळीसह मका, कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

गारपीटीने प्रचंड नुकसान
तालुक्यातील दुई, सुकळी, डोलारखेडा, रामगड, पिंप्री आकाराऊत, कुंड, घोडसगाव आदी भागात वादळासह गारपीटीने नुकसान झाले तर शुक्रवारी दुपारी तीन ाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वार्‍यासह पावसासह गारपीटीला सुरुवात झाली. तब्बल 20 मिनिटे गारपीट झाली तर अनेक वृक्ष कोसळले तर केळी उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. सुकळी, दुई, डोलारखेडा, घोडसगाव, कुंड, पिंप्री अकाराऊत या पूर्णा काठावर गारपीटमुळे नुकसान झाले असून तालुक्यातील सातोड, तरोडा, रुईखेडा, ढोरमाळ, निमखेडी खुर्द आदी भागात गारपीटीमुळे कांदा व मका पीकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.

पंचनाम्यासोबत हवी भरपाई
संध्याकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले अन मेघगर्जनांसोबत पावसाला सुरूवात झाली आहे. प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !