आधी आदित्य बाळाला सांभाळा : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
Take care of baby Aditya first: BJP leader Chitra Wagh’s taunt to Uddhav Thackeray मुंबई : तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा, असं म्हणत उद्धव ठाकरेंना भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खोचक टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरू केलीय. पण जनता सुज्ञ आहे. तुमच्या या भूलथापांना जनता भीक घालणार नाही, आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही उद्धव ठाकरे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
ठाकरेंच्या इशार्यानंतर भाजपाचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सगळ्यांना शहाणे होण्याची वेळ आली आहे. नुसती वज्रमूठ करून उपयोग नाही. हा भगवा या वज्रमूठीत घट्ट धरायचा आहे. भगव्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो साफ करून छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा भगवा पुन्हा एकदा तेजाने उंच फडकवत ठेवायचा आहे. याची सुरुवात महापालिकेपासून करायची आहे. उद्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्या तरी तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा ठाकरे यांनी दिला होता व त्यानंतर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपा नेत्यांचे टिकास्त्र
तुम्ही मुंबईची काळजी करू नका मुंबई सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी सक्षम आहेत. तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच सबझूट _सभा आणि मोकळी मूठ असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. उद्धव ठाकरे, तुम्ही जमीन दाखवण्याच्या वल्गना करू नका… भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांनी तुम्हाला आधीच आसमान दाखवलंय.. चिखलात लोळवलंय अन् चीतपट केलंय असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
